best seller books

Gulamgiri – Mahatma Jyotiba Phule Books, Jyotirao Fule Book In Marathi Shetkaryancha Asoodjotiba Jotirao, Savitribai Phule Jyoti Rao Phulle Aasud Sarvajanik Satyadharma Shetkaryacha Asudjivan Kranti

0 minutes, 22 seconds Read


Price: ₹150 - ₹119.00
(as of Nov 10, 2024 11:31:06 UTC – Details)



“या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनीं तिजविषयीं नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे.
ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेचीं क्रूर शासनें दिलीं. पुढे कांहीं काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचें मुळींच छपवून ठेविलें. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले.
इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणीं इतिहास वगैरे ग्रंथांत भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक, म्हणजे, शूद्रादि अतिशूद्र लोक ह्यांस आपले गुलाम करून टाकिलें आहे, असें संमत दिलेलेंच आहे.
या देशात इंग्रज सरकार आल्यामुळें शूद्रादि अतिशूद्र भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठें दुःख वाटतें कीं, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष असल्यामुळें ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधानें त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलें नाहीं. भट लोक त्या सर्वांस प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष पोंहचलें नाहीं, तर त्यांनीं दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावें अशी आम्हीं आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों.”

१ जून १८७३
जो. गो.

From the Publisher

GulamgiriGulamgiri

“या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनीं तिजविषयीं नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे. ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेचीं क्रूर शासनें दिलीं. पुढे कांहीं काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचें मुळींच छपवून ठेविलें. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले. इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणीं इतिहास वगैरे ग्रंथांत भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक, म्हणजे, शूद्रादि अतिशूद्र लोक ह्यांस आपले गुलाम करून टाकिलें आहे, असें संमत दिलेलेंच आहे. या देशात इंग्रज सरकार आल्यामुळें शूद्रादि अतिशूद्र भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठें दुःख वाटतें कीं, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष असल्यामुळें ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधानें त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलें नाहीं. भट लोक त्या सर्वांस प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष पोंहचलें नाहीं, तर त्यांनीं दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावें अशी आम्हीं आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों.”

१ जून १८७३

जो. गो.

GulamgiriGulamgiri

या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दु:खें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडेस त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनी तिजविषयी नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे.

ज्या ईश्वरानें शूद्रादि अतिशूद्रांस व इतर लोकांस आपण निर्माण केलेल्या सर्व सृष्टींतील वस्तूंचा सारिखे रीतीनें उपभोग घेण्याची मोकळीक दिली असून, भट लोकांनी त्याचे नांवचे खोटे ग्रंथ बनवून त्यांजमध्यें सर्वांचें हक्क रद्द करून आपणच अग्रगण्य होऊन बसले. याजवर आमचें कोणी भट बंधु अशी शंका घेतील कीं, हे ग्रंथ जर खोटे आहेत तर त्याजवर शूद्रादि अतिशूद्र यांचे पूर्वजांनी कसा भरवसा ठेविला व हल्लीही त्यापैकी पुष्कळ कसा भरवसा ठेवितात? तर त्याचें उत्तर असें आहे कीं, आतांच्या या सुधारलेल्या काळांत कोणावर कांहीं जुलूम नसून सर्वांस आपल्या मनांतील विचार स्पष्ट रीतीनें लिहिण्याची अथवा बोलण्याची परवानगी असून एखाद्या शहाण्या गृहस्थाकडे कोणी लबाडानें एखाद्या मोठ्या गृहस्थाच्या नांवाचें खोटें पत्र जरी आणलें, तथापि त्यास कांहीं वेळपर्यंत त्याजवर भरवसा ठेवावा लागतो व समयानुसार तोहि फसला जातो. अशी जर गोष्ट आहे, तर शूद्रादि अतिशूद्र एके वेळीं भट लोकांचे जुलुमाचे तडाक्यांत सापडल्यामुळें व त्यांस त्यांना

सर्वस्वी अज्ञानी करून सोडिल्यामुळे आपले हिताकरितां समर्थाचे नांवाचे खोटे ग्रंथ करून त्यांजकडेस त्यांचें मन वळवून त्यांस फसविलें व अद्यापही त्यांपैकीं कित्येकांस भट लोक हल्लीं फसविताहेत. हें शुद्ध वर सांगितलेल्या प्रकाराप्रमाणें आहे. भट लोक आपलें पोट भरण्याकरितां आपले स्वार्थी ग्रंथांतून वारंवार जागोजागी अज्ञानी शूद्र लोकांस उपदेश करितात, त्याजमुळें त्यांच्या मनामध्यें त्याजविषयीं पूज्यबुद्धि उत्पन्न होऊन त्यांस त्यांनी (भट लोकांनी) ईश्वरालाच मात्र जो योग्य सन्मान तो आपणास देवविण्यास लाविलें आहें, हा कांहीं लहानसहान अन्याय नव्हे.

मनुष्याला स्वतंत्रता असणें ही एक मोठी जरूरीची गोष्ट आहे. जेव्हां मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हां त्यास आपले मनांत उद्भवलेले विचार स्पष्ट रीतीनें इतर लोकांस बोलून अथवा लिहून दाखवितां येतात. तेच विचार त्यास स्वतंत्रता नसल्यामुळें मोठे महत्त्वाचे असून लोकांना हितावह कां असेनात, तथापि ते त्यास दुसरे कोणास कळवितां येत नाहींत; आणि असें झालें म्हणजे कांहीं काळानें ते सर्व विचार लयास जातात. त्याचप्रमाणें मनुष्य स्वतंत्र असल्यापासून तो आपले, सर्व मनुष्यमात्रांस जे सर्वसाधारण हक्क, सर्व जगाचा जो नियंता व सर्वसाक्षी परमेश्वर त्यानें दिलेले असून केवळ स्वहिताकडेस ज्याचें लक्ष्य, असे कृत्रिमी लोकांनी लपवून ठेविलें, तर त्यांपासून मागून घेण्यास कधीं मागें सरणार नाहीं व त्यांचे हक्क त्यास मिळाले असतां त्यास सुख होतें.

जेव्हांपासून शूद्रादि अतिशूद्रांमध्यें भट लोकांनीं जातिभेद उत्पन्न केला तेव्हांपासून त्या सर्वांची मतें भिन्न भिन्न झालीं. मग अर्थातच त्यास त्यांची पाहिजे तशी अवस्था करण्यास सवड सांपडली. याविषयीं एक जगप्रसिद्ध म्हण आहे. ती अशी कीं, ‘दोघांचे भांडण आणि तिसर्‍याला लाभ’. म्हणजे भट लोकांनीं शूद्रादि अतिशूद्रांमध्यें आपआपसांत वैमनस्य आणून आपण त्यांचे जिवावर ऐषआराम भोगीत आहेत.

आम्हांस सांगण्यास मोठें दु:ख वाटतें कीं, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष असल्यामुळें ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधानें त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलेलें नाहीं. भट लोक त्या सर्वांस एकंदर सर्व प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष पोंहचलें नाहीं, तर त्यांनी दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावें अशी आम्हीं आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों.

– प्रस्तावनेतून

GulamgiriGulamgiri

नारसिंह, हिरण्यकश्यपु, प्रल्हाद, विप्र, विरोचन इत्यादिकांविषयीं.

धों. — वराह मेल्यावर द्विज लोकांचा कोण अधिकारी झाला?

जो. — नृसिंह.

धों. — नृसिंह स्वभावानें कसा होता?

जो. — नृसिंहाचा स्वभाव लोभी, कृत्रिमी, फितुरी, कपटी, घातकी, निर्दय आणि क्रूर होता. तो शरीरानें सदृढ असून अतिशय बलवान होता.

धों. — त्यानें काय काय केलें?

जो. — प्रथम त्यानें हिरण्यकश्यपूच्या वधाविषयीं विचार चालविला व आपणास त्याला मारिल्याशिवाय त्याचें राज्य मिळायाचें नाहीं असें त्याचे मनांत पक्केपणीं समजलें. हा त्याचा दुष्ट हेतु सिद्धीस जाण्याकरितां त्यानें गुप्त रीतीनें बहुत दिवस प्रयत्न करून, एका आपल्या द्विज पंतोजीकडून हिरण्यकश्यपूच्या प्रल्हाद या नांवाच्या मुलाच्या कोवळ्या मनावर आपल्या धर्माची मूलतत्त्वें ठसविल्यावरून प्रल्हादानें आपल्या हरहर या नावाच्या कुळस्वामीची पूजा करण्याची वर्ज केली. नंतर हिरण्यकश्यपूनें प्रल्हादाचें भ्रष्ट झालेलें मन पुन: आपल्या कुळस्वामीची पूजा करण्याकडेस वळवावें म्हणून नानातर्‍हेचे उपाय केले; तथापि नृसिंह हा प्रल्हादास आंतून मदत करीत असल्यामुळें हिरण्यकश्यपूचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी नृसिंहानें त्या अज्ञानी मुलास अनेक थापा देऊन त्याचें मन इतकें भ्रष्ट केलें कीं, त्यानें आपल्या पित्याचा वध करावा म्हणून त्याचे मन वळविलें खरें, परंतु तें अघोर कर्म करण्यास त्या मुलाची छाती होईना; सबब नृसिंहाने संधी पाहून ताबुतांतील वाघांच्या सोंगासारिखे आपल्या सर्व अंगास रंग देऊन तोंडांत मोठमोठाले खोटे दांत धरून लांब लांब केसांची दाढी लाविली आणि तो एक तर्‍हेचा भयंकर सिंह बनला. हें सर्व कृत्रिम छपविण्याकरितां नृसिंहानें भरजरीचें एक ऊंची लुगडें नेसून गरतीसारिखा आपल्या तोंडावर लांबलचक पदर घेऊन मोठ्या थाटानें चमकत ठमकत त्या मुलाच्या मदतीनें एके दिवशी त्याचे पित्याच्या विशाळ मंदिरात खांबांची गर्दी होती त्यांत जाऊन लपून उभा राहिला. इतक्यात हिरण्यकश्यपू सर्व दिवसभर राज्यकारभार करून थकल्यामुळें संध्याकाळ झाल्याबरोबर आपल्या मंदिरात एकांती येऊन निर्भयपणानें स्वस्थ विसावा घेण्याच्या इराद्यानें पलंगावर लोळत पडला न पडला, तोंच नृसिंहाने जलदी करून डोईवरचा लुगड्याचा पदर कंबरेस गुंडाळून त्या लपलेल्या खांबांतून निघून हिरण्यकश्यपूच्या आंगावर एकदम जाऊन पडला आणि त्यानें आपल्या हातांतील वाघनखांनी हिरण्यकश्यपूचें पोट फाडून त्याचा वध केल्याबरोबर नृसिंहाने तेथील सर्व द्विजांसहित रात्रीचा दिवस करून आपल्या मुलुखांत पळून गेला. इकडेंस नृसिंहानें प्रल्हादास फसवून असें अघोर कर्म केलेलें उघडकीस आल्यावरून क्षत्रियांनी आर्य लोकांस मुळींच द्विज म्हणण्याचे सोडून त्यांस विप्रिय म्हणूं लागले व पुढें त्या विप्रिय शब्दापासून त्यांचें नांव विप्र पडलें असावें. पुढें क्षत्रियांनी नृसिंहास नारसिंह म्हणजे सिंहाची बायको असें निंद्य नांव दिलें. शेवटीं हिरण्यकश्यपूच्या पुत्रांतून कित्येकांनी तर नारसिंहास धरून आणून त्यास यथास्थित शासन करावें म्हणून दीर्घ प्रयत्न केला. परंतु नारसिंहानें हिरण्यकश्यपूचें राज्य घेण्याची मुळीच आशा सोडून केवळ मुलुखास आणि जिवास संभाळून पुढें काही दुसरी गडबड केल्याशिवाय मरण पावला.

धों. — तर मग नारसिंहाच्या अशा अघोर कर्मावरून त्याच्या नांवानें मागें पुढें कोणी त्याची छी: थू करूं नये या भयास्तव विप्र इतिहासकर्त्यांनी कांहीं काळ लोटल्यानंतर संधी पाहून नारसिंहाविषयीं तो खांबापासून जन्मला वगैरे नानातर्‍हेच्या लबाड्या कल्पून इतिहासांत दाखल केल्या असाव्या, असें सिद्ध होतें.

जो. — यांत कांही संशय नाहीं. कारण तो जर खांबापासून जन्मला असेल असें म्हणावें, तर त्याची कोणी तरी दुसर्‍यानें नाळ कापून त्याच्या तोंडांत दुधाचा बोळा दिल्याशिवाय तो कसा वाचला असेल. नंतर त्यास कोणी तरी दुसर्‍यानें दाईचें अथवा वर दूध पाजल्याशिवाय तो लहानाचा मोठा कसा झाला असेल! कदाचित तसेंही घडून आलें असेल म्हणावें, तर तेणेंकरून एकंदर जो सृष्टिक्रम चालत आला आहे, त्यास बाध येतो. या गप्पाड्या विप्र ग्रंथकारांनीं नारसिंहास एकदम लाकडाच्या खांबातून बाहेर काढिल्याबरोबर त्यास दुसरी कोणाची मदत न देता आपल्या आपण इतका शक्तिमान दाढी मिशांचा ठोंब्या केला कीं, ज्यानें लागलीच हिरण्यकश्यपूस मांडीवर घेऊन त्याचें पोट नखानें फाडून त्याचा वध केला. अरेरे!! जो पिता आपल्या समजुतीप्रमाणें पितृधर्म मनीं आणून केवळ शुद्ध ममतेनें आपल्या स्वपुत्राचें मन खर्‍या धर्माकडेस वळवावें म्हणून खटपट करीत होता, त्यास त्या सर्वसाक्ष आदिनारायणाच्या अवतारानें असें देहान्त शासन करावें काय! असें शासन अज्ञानी मनुष्याचा अवतारसुद्धा करणार नाहीं. तो आदिनारायणाचा अवतार असल्यामुळें त्यानें त्या हिरण्यकश्यपूस दर्शन देतांच मी आदिनारायण आहें अशी त्याची खात्री करून, पिता व पुत्र या उभयतांमध्यें सलोखा करून देण्याचें एकीकडेस टाकून त्याचा असा निर्दयपणानें वध केला, हें मोठें आश्चर्य होय. त्याच्यानें जर त्या हिरण्यकश्यपूची उपदेश करून खात्री करवली नाहीं तरी तो सर्वांचे बुद्धीचा दाता कशाचा? यावरून असें सिद्ध होतें कीं, नारसिंहामध्यें या आपल्या पुण्यांतील एका शेणपुंज्या रांडेइतकी अक्कल नव्हती; कारण कीं जिनें, पाहा, येथील एका प्रतिबृहस्पती म्हणविणार्‍या एका विद्वानास केवळ आपल्या गोड बोलण्याचा लळा लावून त्यास आपला गुलाम करून टाकिलें आहे. हल्लीं हिंदुस्तानांत अमेरिकन आणि युरोपियन मिशनरींनीं आपल्यांतील कित्येक तरुणांस ख्रिस्ती धर्मानुसारी केलें आहे; परंतु त्यांनीं एकाहि तरुणाच्या पित्याचा वध केला नाहीं, हें मोठें आश्चर्य होय!

धों. — नारसिंहाची अशी फजिती झाल्यावर विप्रांनी प्रल्हादाचें राज्य घेण्याविषयीं कांहीं प्रयत्न केले किंवा नाहीं?

जो. — विप्रांनी प्रल्हादाचें राज्य घ्यावें या इराद्यानें अनेक तर्‍हेचे चोरून उपाय केले; परंतु ते सर्व व्यर्थ गेले. कारण, प्रल्हादाचे पुढें डोळे उघडून त्याच्या मनांत विप्रांचें कपट दिसून आलें. यावरून प्रल्हादानें विप्रांचा काडीमात्र विश्वास न धरतां सर्वांशी वरकांती स्नेह ठेवून, आपल्या राज्याची नीट व्यवस्था करून मरण पावला.. नंतर त्याचप्रमाणें प्रल्हादाचा पुत्र विरोचन यानें आपलें राज्य संभाळून त्यास बळकटी आणून मरण पावला. विरोचनाचा पुत्र बळी हा मोठा पराक्रमी निघाला. त्यानें प्रथम आपल्या आश्रयानें राहणार्‍या लहान लहान क्षेत्रपतींस दुष्ट दंगेखोरांच्या त्रासापासून सोडवून त्यांजवर आपलें वर्चस्व बसविलें. नंतर त्यानें आपलें राज्य उत्तरोत्तर वाढविण्याचा क्रम चालविला. त्या वेळीं विप्रांचा मुख्य अधिकारी वामन होता. त्यास तें सहन होईना. सबब बळीचें राज्य एकदम लढून घ्यावें म्हणून चोरून मोठी फौज तयार करून एकाएकीं बळीच्या सरहद्दीवर येऊन ठेपला. वामन अतिशय लोभी, धाडसी आणि हेकेखोर होता.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (13 March 2023); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 120 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203852
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203857
Item Weight ‏ : ‎ 130 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *